Sunday, February 15, 2009

सहजता


सहजता


‘सहजता’... असं खरंच काही असतं?
का नुसतेच शब्दांचे खेळ
कशाचाच कशाला नाही मेळ
एका संध्याकाळी सहजतेच्या शोधात मी,
आर्त मी.. खोल मी.. डोह मी..मी.. मी नाहीच...

काचेच्या तावदानांमागचे ओळखीचे मुखवटे
वाहनांच्या धुरात उडून जाणारी माती..
एक रात्र याच विचारात तळमळत होती
एक पहाट याच विचारात खडबडून जागी झाली..
आणि सकाळ रानोमाळ भटकू लागली..
सहजता शोधूनच परत यायचं या निर्धारात !
कुठेच सापडेना, कुठे टपून बसलीय का तीही झाली भूमिगत
काहीच अंदाज लागेना


शोध सुरूच.. अविरत
त्या सकाळी एका कौलारू नाजूकशा घराच्या दारात मी..
आर्त मी.. खोल मी.. डोह मी..
मी.. मी नाहीच...
नजर बेभानपणे आसपासच्या वावराचा ठाव घेत होती..
तीही हट्टी.. किंवा थोडी माजखोर.. मिटायला तयार होईना...


एक ऊबदार तळवा हाताला लागला..
एक निरागस नजर टकमक पाहत होती..
त्या विनापाश मुखातून शब्द आले.... ..हे काये ?
ती अनोळखी नजर जीवघेणी ओळख देत होती
माझ्याजवळील कॅमेऱ्यात हा अनोखा क्षण टिपत होती..
पाहताच एक दव टपकन हातावर पडला..
त्या दवानं हळूच कानात सांगितलं..
सहजता..अशी सहजच सापडून जाते !!!3 comments:

kunal said...

sahajach comment kartoy.. chhan lihita.. keep it up..

Anjali said...

I liked it.... really its difficult tobe simple... no may be "SAHAJ"

raya said...

hmmm...

ek sakshatkaar,
ek najar,
ek sparsha,
ek mithi,
ek aayushya...

sagal khartar sahajch...
jaganch sahaj...


aso,
atta itkach...