Sunday, February 15, 2009

आग


मुंबईवरील दहशतवादी हल्ला 26/11 ही तारीख मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत.ताज,ओबेरॉय,नरीमन हाऊस ही नावं कोरली गेली इतिहासात एका भयंकर अशा दुःस्वप्नामुळे...जे दुर्दैवाने सत्य ठरलं. ताजची आग कोणीच विसरू शकत नाही.अरुण कोलटकरांची ‘आग’ ही कविता याच भयानक वास्तवाचं विदारक दर्शन घडवते.कोलटकरांनी ही कविता खूप पूर्वी लिहीली,पण ती आजच्या परिस्थितीशी देखील लागू होतेय हे आपलं दुर्भाग्य..स्वातंत्र्योत्तर काळातले एक प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणजे अरुण कोलटकर.मध्यप्रवाहाला नवे वळण देणारी त्यांची कविता मराठीच्या सीमारेषा ओलांडून वैश्र्विक स्तरावर गेली.आपल्या कवितेबद्दल त्यांनीच कधीतरी लिहून ठेवलं आहे-‘सध्या माझी कविता चाललेली आहे ती वाट सर्वसामान्य वाचकाच्या घरावरूनच जाते.पण ती तिथं थांबणार नाही.पुढं जाणाराय- कविताबिविता वाचायच्या भानगडीत सहसा न पडणा-या रसिकाच्या शोधात! ’ खरंच, पुढील कविता वाचताना हे तंतोतत पंटतंय...

ही आग ही हसरी ही दुसरी
हिचं काय करू हिला कुठं ठेऊ
ही लाऊ का घराला दाराला जगाला
ही काय रांधेल ही कुठे पसरेल
ही चूड कुठं फेकू
ही आग शिरोधार्य
ही आग हो मशाल
हिला डोक्यावर घेऊन नाच

ही आग आगाग ही होळी
धावणारं कुंपण मी पळणारा वासा ही होळी ही होळी ही होळी
मोडलेली खिडकी मी तोडलेलं दार ही होळी ही होळी ही होळी
लंगडणारी खुर्ची मी खुरडणारं टेबल ही होळी ही होळी ही होळी
उडणारं कपाट मी लुटणारी वखार ही होळी ही होळी ही होळी

बिनभुयार हे जग हे लाक्षागृह
निरुपाय निरुपाय आगीचे बंब वाळूच्या बादल्या पाण्याच्या टाक्या
तू आग मी खाक
तू आज मी रोख
तू काल तू आग तू उद्या
तू आग तू आत्ता तू मघा तू मग
तू गुल मी छडी
तू गंधक मी काडी
तू धुनी मी मुनी
तू आग तू माग तू घे
मी धूर मी धूर मी धूर
यज्ञ मीच यजमान मीच वेदी मीच पुरोहित मीच स्थंडिल मीच
आहुती मीच
ही आगच अडाणी
समरपयामि समरपयामि समरपयामि

पेटेल आयाळ आवरतं घे
भाजेल शेपूट सांभाळून ने
चल रे माझ्या सिंहा जरा नमतं घे
या जळत्या वर्तुळातून उडी मारून जा आरपार
इकडून तिकडे नि पुन्हा तिकडून इकडे
ही शून्याकार आग ही जळती मोकळीक रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

राजाभाई टॉवर गेटवे ताज
मॅजेस्टिक हॉटेल
या इमारती श्वापदं कोल्हे वाघ रानडुकरं
हे जंगल घडीव हा स्पष्ट अंधार
ही गिधाडं

तू शेकोटी शेजारी आग
पांगव हे शहर ताटकळव

राजाभाई टॉवर गेटवे ताज
मॅजेस्टिक हॉटेल चर्चगेट स्टेशन
टाऊन हॉल व्ही टी रीगल इरॉस
तटस्थ स्तब्ध
जळत रहा please माझ्यासाठी
ऊब राख मला

हे शहर घाबरव
नाहीतर या बिल्डींगा मला फाडून खातील
हे शहर जैसे थे तू म्हणून नाहीतर नाहीतर

दहशत हो शहराला म्युझियमला
शेजारी अस



No comments: