Tuesday, December 17, 2013

शब्द अपुरे पडतात तेव्हा…

सगळंच 140 अक्षरांमध्ये कसं सांगणार ट्विटर राव…
ते घाव इतक्या तुटपुंज्या शब्दांत मावणार नाहीत आताशा..
ते घाव त्या निर्भयावर होते…
ते घाव त्या नकोशीवर होते…
ते घाव त्या दामिनीवर होते…
हरयाणातल्या त्या कुमारिकेवर होते…
तर खैरलांजीतल्या प्रियांकावरही केलेले ते निर्घृण घाव होते…
बलात्काराला जात नसते, पण स्त्री ही एकमेव जात उरतेच ना तरीही…
पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी !
माणुसकी हा चार अक्षरांचा शब्द डिलीट होत चाललाय ट्विटर राव…
तू एकशेचाळीस अक्षरांचं काय घेऊन बसलास?

त्या दामिनी… त्या रागिणी शब्दांनी वार तर करत होत्या
पण अपुरे पडले ते शब्द राक्षसी वासनेपुढे…

एकशेचाळीस अक्षरं लांब राहिली रे ट्विटर राव…
एक हुंदका…
तो कसा पोस्ट करू सांग फक्त…

Monday, December 9, 2013

मरण पाहून आल्यावर...

मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा 

विश्वास उडतो की दृढ होत जातो ?


उसवलेल्या धाग्यांची गुंतागुंत वाढते की तुटलेपणाची जाणीव आणखीनच विषण्ण करते ?

मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,

तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला 
कधी काळी दिलेला विसावा …. 

मरण भयानक असतं की अधिकच शांत ?

ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?

मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक … 
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !

मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की  नको इतकं सोपं ?

प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!

-Neelima Kulkarni

Sunday, May 19, 2013

Nivadnukiche Zolbacchan


जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रोजच मानापमानाचा प्रयोग रंगला आणि नाट्यक्षेत्रात आम्ही सख्खे शेजारी’ म्हणवणारे झोलबच्चन’ एकमेकांनाच बेचकी’ मारू लागले.पोस्टाने मतपत्रिका पाठवणे त्याही हस्ते-परहस्ते, ही निवडणूक प्रक्रिया मुळातच सदोष.त्यात खोट्या मतपत्रिका छापल्या गेल्या.तब्बल 1999 मतपत्रिका बनावट आढळल्याने मुंबई विभागाची निवडणूकच रद्द करण्यात आली.

घरपोच मतपत्रिका पाठवल्या असतानाही अनेकांना त्या मिळाल्याच नाहीत.खोट्या मतपत्रिका मतमोजणीदरम्यान दिसल्या आणि 
बे दुणे पाचचा धक्कादायक हिशोब पुढे आला, तेव्हा या निवडणूक नाट्याने अक्षरशक्लायमॅक्स गाठला.
विच्छा माझी पुरी करा’ म्हणत सर्व उमेदवारांनी कंबर कसली होतीच, मात्र त्यांची नजर होती मराठी नाटकांसाठी जाहीर झालेल्या पाच कोटींच्या अनुदानावर!

त्यातच वर्षातून एकदा भरणारं नाट्यसंमेलनही राजाश्रयाशिवाय होत नाही.राजकीय स्वागताध्यक्षाशिवाय संमेलनाची नांदी सुरु होत नाही.तरीही राजकारण्यांनाही लाजवेल अशीचेहराफेरी’ नाट्यपरिषद निवडणुकांमध्ये दिसली.एकमेकांवर कुरघोड्या करणारे नाट्यवर्तुळातलेबहुरुपी रोजच मुखवटे बदलताना दिसले.
एक वेळ गिधाडे बरी पण ही कलावंत मंडळी त्याहीपेक्षा पुढे गेली.सरकारी पैशांवर डोळा ठेवून खुर्चीसाठी वाट्टेल ते करताना त्यांनी सौजन्याची ऐशी तैशी’ तर केलीच पण निवडणुकीचेही धिंडवडे काढले.

सत्वहीन मंडळी अधिकच निसत्व उद्योग करू लागली. तो मी नव्हेच म्हणत सत्तेसाठी इथे अक्षरश: आंधळ्यांची शाळा’ भरली.नटराज पॅनेल आणि उस्फूर्त पॅनेल यांनी एकमेकांवर केलेले आरोप पाहून संशयकल्लोळ अधिकच बळावला.

रंगभूमीचे हे घाशीराम’ रंगभूमी सोडून इतर मोहांना बळी पडले की काय अशी शंका वाटू लागली आहे.स्वत:ला नटसम्राट’ म्हणवणा-या या कलावंतांनी कला सोडून बाकीच्या गोष्टींना दिलेलं असाधारण महत्व पाहता आता त्यांनी घरी बसावं हेच उत्तम.कारण सुखान्त’ हवा असेल तर कलेचं वस्त्रहरण’ आता पुरे झालं.अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी नवा गडी नवं राज्य’ पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र या खुर्चीलोलूप धटिंगणांमुळे रंगभूमीचा सूर्यास्त पाहावा लागू नये हीच रंगदेवतेचरणी प्रार्थना!!!


 21 February 2013

Wednesday, April 24, 2013




Paaus Pahtana aatlya aat kahitari halate...




Khidkichya Kachewar Ashru Oghalat Rahtat...


Ani Dole Korde Thakka Houn Baghat Rahtat Bahercha Paaus...




Aaj Akashala Jamlay Kosalayla,


Aplyakade Tyacha dekhil Dushkaal...




Maati cha Gandh Manat darwalat Rahto...


Tevdhich Ek Oli Jakham Sukhawate....




Sparsha chi Tahan Gandhawar Bhagwate!

- Neelima