Monday, December 9, 2013

मरण पाहून आल्यावर...

मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा 

विश्वास उडतो की दृढ होत जातो ?


उसवलेल्या धाग्यांची गुंतागुंत वाढते की तुटलेपणाची जाणीव आणखीनच विषण्ण करते ?

मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,

तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला 
कधी काळी दिलेला विसावा …. 

मरण भयानक असतं की अधिकच शांत ?

ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?

मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक … 
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !

मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की  नको इतकं सोपं ?

प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!

-Neelima Kulkarni

Sunday, May 19, 2013

Nivadnukiche Zolbacchan


जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणूक.’सगळे उभे आहेत’ म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथे पाहायला मिळाला.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रोजच ‘मानापमाना’चा प्रयोग रंगला आणि नाट्यक्षेत्रात आम्ही ‘सख्खे शेजारी’ म्हणवणारे ‘झोलबच्चन’ एकमेकांनाच ‘बेचकी’ मारू लागले.पोस्टाने मतपत्रिका पाठवणे त्याही हस्ते-परहस्ते, ही निवडणूक प्रक्रिया मुळातच सदोष.त्यात खोट्या मतपत्रिका छापल्या गेल्या.तब्बल 1999 मतपत्रिका बनावट आढळल्याने मुंबई विभागाची निवडणूकच रद्द करण्यात आली.

घरपोच मतपत्रिका पाठवल्या असतानाही अनेकांना त्या मिळाल्याच नाहीत.खोट्या मतपत्रिका मतमोजणीदरम्यान दिसल्या आणि 
‘बे दुणे पाच’चा धक्कादायक हिशोब पुढे आला, तेव्हा या निवडणूक नाट्याने अक्षरश: क्लायमॅक्स गाठला.
‘विच्छा माझी पुरी करा’ म्हणत सर्व उमेदवारांनी कंबर कसली होतीच, मात्र त्यांची नजर होती मराठी नाटकांसाठी जाहीर झालेल्या पाच कोटींच्या अनुदानावर!

त्यातच वर्षातून एकदा भरणारं नाट्यसंमेलनही राजाश्रयाशिवाय होत नाही.राजकीय स्वागताध्यक्षाशिवाय संमेलनाची नांदी सुरु होत नाही.तरीही राजकारण्यांनाही लाजवेल अशी‘चेहराफेरी’ नाट्यपरिषद निवडणुकांमध्ये दिसली.एकमेकांवर कुरघोड्या करणारे नाट्यवर्तुळातले‘बहुरुपी’ रोजच मुखवटे बदलताना दिसले.
एक वेळ ‘गिधाडे’ बरी पण ही कलावंत मंडळी त्याहीपेक्षा पुढे गेली.सरकारी पैशांवर डोळा ठेवून खुर्चीसाठी वाट्टेल ते करताना त्यांनी ‘सौजन्याची ऐशी तैशी’ तर केलीच पण निवडणुकीचेही धिंडवडे काढले.

सत्वहीन मंडळी अधिकच निसत्व उद्योग करू लागली. ‘तो मी नव्हेच’ म्हणत सत्तेसाठी इथे अक्षरश: ‘आंधळ्यांची शाळा’ भरली.नटराज पॅनेल आणि उस्फूर्त पॅनेल यांनी एकमेकांवर केलेले आरोप पाहून ‘संशयकल्लोळ’ अधिकच बळावला.

रंगभूमीचे हे ‘घाशीराम’ रंगभूमी सोडून इतर मोहांना बळी पडले की काय अशी शंका वाटू लागली आहे.स्वत:ला ‘नटसम्राट’ म्हणवणा-या या कलावंतांनी कला सोडून बाकीच्या गोष्टींना दिलेलं असाधारण महत्व पाहता आता त्यांनी घरी बसावं हेच उत्तम.कारण ‘सुखान्त’ हवा असेल तर कलेचं ‘वस्त्रहरण’ आता पुरे झालं.अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी ‘नवा गडी नवं राज्य’ पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र या खुर्चीलोलूप धटिंगणांमुळे रंगभूमीचा ‘सूर्यास्त’ पाहावा लागू नये हीच रंगदेवतेचरणी प्रार्थना!!!


 21 February 2013

Wednesday, April 24, 2013




Paaus Pahtana aatlya aat kahitari halate...




Khidkichya Kachewar Ashru Oghalat Rahtat...


Ani Dole Korde Thakka Houn Baghat Rahtat Bahercha Paaus...




Aaj Akashala Jamlay Kosalayla,


Aplyakade Tyacha dekhil Dushkaal...




Maati cha Gandh Manat darwalat Rahto...


Tevdhich Ek Oli Jakham Sukhawate....




Sparsha chi Tahan Gandhawar Bhagwate!

- Neelima

Friday, July 1, 2011


Main ek hi kitaab ka hissa hoon, roj nayi kahani pasand nahi mujhe....haan,par yeh eklouti kahani hogi badi dilchasp....yeh iis kirdar ka waada raha aap se ~ Neelima

Monday, January 31, 2011

फुलपाखरागत भिरभिरायला कोणाला आवडत नाही....
लाटांवर तरंगायला कोणाचे मन झुरत नाही....



फुलपाखरू उडताना बोटांवर रंग ठेवून जाते....
रंगांच्या त्या दुनियेत कॅनवास वर मन द्यायचे झोकून....
आणि इंद्रधनुष्य उभे करायचे
स्वप्नांचे,इच्छांचे,आकांक्षांचे!


आसमंतात विहरणारा नीलपक्षी आपणच व्हायचे असते....
ज्या पंखाना ऊब आहे प्रेमाची, त्यांना तमा नाही वादळाची....
विहरत रहा...आकाश ओंजळीत घ्यायचे आहे
फक्त तुलाच!

Tuesday, November 16, 2010

Hearing ur voice,is like hearing poetry.

With the natural rhythms of ur voice,i hear ur soul.

Its so Genuine..so true

that i need to hear that voice again & again..endlessly
!

Sunday, November 14, 2010

ye na...

Tuzya vina..tuzya nakalat...tarihi zurate tuzyachsathi
aas tu..awaj tu..shwasatla to gandh tu
ka kalena bhaas sare..swapna tu an satyahi tu
virahat tuziya komejate mi..mazyach aat aat ghusmatate mi
aas tuzya bhetichi hi...lavate he ved mala!
ye asa an ye tasa..ye na ...yeshil na
moharaya man maze aatur tya chatakapari
ye asa an ye tasa..ye na ...yeshil na