Thursday, September 23, 2010

'आठवाचा साठव’

'आठवाचा साठव’ आताशा अनावर होऊ लागलाय...

चिंचेचा पार किती आवळायचा..

गुलमोहराला बहर येतच नाही..काय करू?

आभाळ फाटत चाललंय..कुठे कुठे कवटाळू?

एक दोन तीन आणि ..चार
अंगणात लपंडाव स्वतःशीच किती खेळू?

गालिबही म्हातारा झाला..

घोंगावतं वादळ त्यालाही सोसवेना..

आठव..साठव..साठव..आठव..

मोकाट उद्धट वारा..थांबायलाच तयार नाही..

घड्याळातली वाळू सरकत चालली खाली वेगानं..

पण वा-याला उसंत असेल तर ना..

वाट पाहण्याचा म्हणे त्याने कहर केला..

डोळ्याच्या खाचा झाल्या ‘नजर रास्ते पे बिछाके’

आठव..साठव..साठव..आठव..बास!

Thursday, September 2, 2010

पारिजातकाचा सडा...


आठवणींच्या कुपीत
           पारिजातकाचा सडा

किती वेचू,
              किती आठवू

क्षण माझा मोहरुन विसरले मी मला....

ओंजळीत वेचलेली फुलं मनात दरवळतात...

किती घेऊ,
               किती टिपू

क्षणांचा सहवास मला साद घालतात!