Wednesday, April 1, 2015


तू ट्विटरवर आहेस का?
तू व्हाॅट्सअप वर आहेस का?
तू इन्स्टाग्रामवर आहेस का?
फेसबुकवर तर असशीलच ना?
असं लोक आजकाल विचारत असतात,
व्हर्च्युअल जगात मीदेखील चिवचिवाट टिवटिवाट करत असतेच..
कधी कामासाठी म्हणून..
कधी जगाला काहीतरी ओरडून सांगायचं म्हणून..
तर कधी गालिब गुलजार कैफ
वेड लावतात म्हणून...
तर कधी मनातलं काही सांगावसं वाटतं म्हणून...
पण या सगळ्यात महत्वाचा असतो तो निखळ आणि उन्मुक्त संवाद..
तू ट्विटर फेसबुक इन्स्टाग्राम या कुठेही आहेस की नाही हे महत्वाचं नाहीए,
तू माझ्याशी बोलणार आहेस का?
तू माझ्याशी बोलणं ही माझी भूक आहे तशी ती तुझीही आहे का?
हे आणि हेच महत्वाचं ठरतं शेवटी..
संवाद हरवायचा नाही
संवाद साधायचा,
संवाद जगायचा,
संवादून जायचं..
जिथे असू तिथे...तेव्हा
मग आयुष्य सुंदर आहेच,
व्हर्च्युअल नाही,
खरंखुरं ताजंतवानं,
मनमोकळं आयुष्य...

देशील ना मला साथ..या संवादात?
- नीलिमा