Monday, January 31, 2011

फुलपाखरागत भिरभिरायला कोणाला आवडत नाही....
लाटांवर तरंगायला कोणाचे मन झुरत नाही....फुलपाखरू उडताना बोटांवर रंग ठेवून जाते....
रंगांच्या त्या दुनियेत कॅनवास वर मन द्यायचे झोकून....
आणि इंद्रधनुष्य उभे करायचे
स्वप्नांचे,इच्छांचे,आकांक्षांचे!


आसमंतात विहरणारा नीलपक्षी आपणच व्हायचे असते....
ज्या पंखाना ऊब आहे प्रेमाची, त्यांना तमा नाही वादळाची....
विहरत रहा...आकाश ओंजळीत घ्यायचे आहे
फक्त तुलाच!